दिनांक 20 डिसेंबर सोमवार
काल संध्याकाळी विश्रांतीने सर्वांना ताजतावाने केले होते. आज संपूर्ण दिवस विश्रांती साठी राखीव ठेवण्यात आला होता. सकाळी सातच्या आसपास एक छोटासा जंगल ट्रेक करून सर्वजण नाश्त्यासाठी पुन्हा एकत्र जमलो. आधी नकार, मग सर्वांची उपस्थिती आणि शेवटी मस्त एकत्रित फोटो अशाप्रकारे छान जंगल फेरी झाली. नाश्ता झाल्यावर सर्वांनी पाण्याच्या खेळांकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला. नवीन जर्सी घालूनच पाण्यात उतरण्याचे ठरवलं आणि आमच्या एकूण पॅकेज मध्ये उपलब्ध असलेले सर्व खेळांचे प्रकारा अनुभवले. तसेच या पॅकेज मध्ये नसलेल्या एका खेळ प्रकारही अनुभवला. तसेच या खेळासाठी कंपनीने फोटोची सोय केल्याने हे सर्व आठवणींमध्ये तसेच कॅमेरातही कैद झाले. यामध्ये एका खेळामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये म्हणजेच काली नदीमध्ये संजय सरांना आपसूक स्नान करण्याची संधी मिळाली.
निलेश सरांनी याची राईड सुरू व्हायच्या आधीच धसका घेतला होता. परंतु water river rafting चा एक नवीन अनुभव सर्वांनाच सुखावून गेला.
सर्वांनाच कडकडून भूक लागली होती. परंपरा रिसॉर्टचे वैशिष्ट्य म्हणजे जेवणातील विविधता. सर्वांनी पोटभर जेवण करून निद्रेला जवळ करण्याचा पर्याय निवडला. झोपण्याआधी सर्वांनी पुनश्च ओ शेठ गाण्याचा आनंद घेतला. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांनी सायकलच्या दुरुस्त करून टकाटक केली. सायकलचे पंचर काढले गेले. संजय सरांनी त्यांची सायकल desembled करून धुवून काढली. शहा सरांच्या सायकलचे ब्रेक नीट करण्यात आले. उद्यासाठी सर्वांनी सायकल तयार केली. संध्याकाळच्या परंपरा मध्ये कॅरम, झोपाळा तसेच जेवणाच्या वेळी शहा सरांच्या विनंती मुळे सुंदर गाण्यांचा आस्वाद घेता आला. आचारी साहेबांनी आज माशाचा बेत आखला होता. त्यावर ताव मारून झाल्यावर अशातच उद्या पहाट निघण्याची तयारी सुरू झाली. शहा सरांनी गोड बोलून पहाटे चहा आणि ब्रेड बटर ची व्यवस्था होईल असे पाहिले. रूम मध्ये जाण्याआधी इथला मालकाच्या मुलाची भेट झाली. आम्ही आमच्या बाजूने सर्व कमी जास्त गोष्टी त्यांना सांगून काही काळ शेकोटीजवळ थांबून डॉरमेट्रिककडे निघालो. पहाटे लवकर निघायचे असल्याने सर्व बॅग व्यवस्थित आवरून ठेवली. सकाळी अंगावर कोणते चिलखत घालावयाचे, ते बाजूला काढले आणि मस्तपैकी दिवसभरातील फोटो व्हिडिओ पहात झोपी गेलो.

No comments:
Post a Comment